Mumbai local | (Archived and representative images)

मुंबई पुणे मुंबई (Mumbai Pune Mumbai) म्हटलं की अनेकांना चित्रपट आठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, हे शिर्षक केवळ चित्रपटालाच नव्हे तर चक्क मुंबई लोकललाही (Mumbai Local ) मिळणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway) आणि खास करुन 'मुंबई पुणे मुंबई' असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गाचा लवकरच विस्तार होणार असून, लवकरच सीएसएमटी ते पुणे (CSMT to Pune) अशी लोकल धावणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारीही जोरदार सुरु आहे.

इंग्रजी वृत्तपत्र मीड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल रेल्वेने केल्याल्या विनंतीनुसार इंटीग्रल कोच फॅक्टरी (Integral Coach Factory)-(ICF)  चेन्नई येथे या लोकलच्या डिझाईनवर कामही सुरु आहे. मध्य रेल्वेवरुन धावणारी 12 डब्यांची ही सर्वात वेगवान लोकल असेल. या लोकलला साधारण 16 ते 32 चाके असतील. ती लोनावळा, कर्जत अशा काही रहदारीच्या स्थानकांदरम्यान थांबे घेईल. सध्या या लोकलचे थांबे, अत्याधूनिक यंत्रणा, व्यवस्थापण आणि इतर तांत्रिक गोष्टींवर काम सुरु आहे. (हेही वाचा, मध्य रेल्वे प्रवाशांना देणार नववर्षाची भेट; 66 नव्या सेवा तर, 49 सेवांचा विस्तार!)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ICF सेंट्रल रेल्वेसाठी आतापर्यंत अशा प्रकारच्या 6 ट्रेन बनवल्या आहेत. सध्यास्थितीला 99.72 किलोमीटर आणि 64 किलोमीटर धावणाऱ्या लोकल या लांब पल्ल्याच्या म्हणून ओळखल्या जातात. ज्या अनुक्रमे कर्जत आणि लोनावळा असा प्रवास करतात. पण, मुंबई ते पुणे लोकल सुरु झाल्यावर हीच लोकल सर्वात लांब पल्ल्याची ठरणार आहे. कारण, ही लोकल सीएसएमटी ते पुणे असा तब्बल 192 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.