Sirohi Rape & Murdered Case: राजस्थान येथील सिरोही येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या, फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Sirohi Rape & Murdered Case: देशात सरकारच्या कठोर कायद्यानंतर सुद्धा महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, बलात्कार आणि हत्येच्या घटना थांबण्याचे नाव घेतच नाही आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसचे प्रकरण ताजे असताना आता राजस्थान (Rajasthan)  मधील सिरोही येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच नराधमाने बलात्कार केल्यानंतर पीडितेची हत्या सुद्धा केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.(Balrampur Gangrape: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार; आरोपींनी कंबर, पाय तोडलेल्या पीडितेचा मृत्यू, बलरामपूर येथील घटना)

अटक करण्यात आलेल्या आरोपीबद्दल माहिती देत राजस्थान मधील रेवदर पोलिस उपअधिक्षक नरेंद्र सिंह देवडा यांनी मीडिला असे सांगितले की, या घटनेनंतर आरोपीने पळ काढला होता. त्याला आज अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात येईल म्हणून त्याने राजस्थान मधून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. आरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा मान्य केला आहे.(Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर)

तर राजस्थान मधील सिरोही जिल्ह्यातील आदिवासी परिसरात एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी घनटेनंतर बलात्कार आणि हत्येचा गु्न्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. घटनेनंतर जिल्ह्यातील लोकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. तर आरोपीला अटक केल्यानंतर त्याला आता कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करत आहेत.