Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत 69,921 नवे रुग्ण आढळले असून 819 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 36,91,167 लाखांवर पोहोचली असून मृतांचा आकडा 65,288 वर पोहोचला आहे. देशात सद्य घडीला 7,85,996 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशात आतापर्यंत एकूण 28 लाख 39 हजार 883 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 7 लाख 92 हजार 541 वर आढळले आहेत. यापैकी 5,73,559 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ देशात तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. देशात 87 हजार वैद्यकीय कर्मचार्‍यांंना कोरोनाची लागण, 573 जणांंचा मृत्यु, IMA अध्यक्षांंचे नरेंद्र मोदी यांना पत्र

जगभरातील कोविड-19 एकूणच परिस्थिती पाहता जगात सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत असून त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी 'आमच्याकडे 3 वेगवेगळ्या लसी क्लिनिकल ट्रायलच्या (Clinical Trials) अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही त्याचे उत्पादन आधीच करत आहोत त्यामुळे डोसेस अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. तसंच त्यामुळे आम्हांला सुरक्षित आणि परिणामकारक लस या वर्षात मिळेल. एकत्रितपणे आपण कोरोना व्हायरसचा नायनाट करु', असे  रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात (Republican National Convention) सांगितले.