फेसबूक आणि जिओच्या करारानंतर आता अमेरिकन खाजगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक (Silver Lake) यांनी देखील मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुप सोबत करार केला आहे. आज (4मे) दिवशी देण्यात आलेल्या माहितीनुसार हा करार 5,656 कोटी रूपयांचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या 1% हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकने जिओमध्ये सुमारे 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये तर एंटरप्राइज व्हॅल्यू 5.15 लाख कोटी झाली असल्याची माहिती जिओकडून देण्यात आली आहे.
टेक्नॉलॉजी आणि फायनान्स क्षेत्रात सिल्वर लेक कंपनीचा दबदबा आहे. सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. 'जिओ' प्रमाणे यापूर्वी सिल्वर लेक कडून अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्कच्या फेसबुकने जिओ सोबत हातमिळवणी केली आहे. Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार.
ANI Tweet
Silver Lake to invest Rs 5,655.75 crore in Jio Platforms
Read @ANI Story | https://t.co/uLaplNG49w pic.twitter.com/zcv6pF4uzZ
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2020
फेसबुकने 22 एप्रिल दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. जिओमध्ये फेसबूककडून सुमारे 5.7 बिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यानंतर मुकेश अंबानींचाही श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील दबदबा वाढला आहे.