Shrikant Shinde | (Photo Credits: Facebook)

शिवसेनेचे (Shivsena) खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Shinde) यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार (Sansad Ratna Awards) जाहीर झाला आहे. 17 व्या लोकसभेत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे 17 व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. 2019 ते 2023 या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केले आहेत. 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि 12 खाजगी विधेयक त्यांनी मांडली आहेत.  (हेही वाचा - Maldives Trip Cancel: मालदीवला मोठा धक्का! पंतप्रधान मोदींच्या अपमानामुळे भारतीय संतप्त, 10 हजार हॉटेल्सचे बुकिंग आणि 5000 उड्डाणे रद्द)

केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.

यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. लोकसभेतील कामकाजात डॉ. श्रीकांत शिंदे सहभागी होत असतात. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेच्या मुद्द्यांवर डॉ. शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.