मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर चप्पल फेकण्यात आली. मात्र, वास्तव असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ खूप जुना आहे. जो 2018 मध्ये घडलेल्या घटनेचा आहे. हा व्हिडिओ 3 सप्टेंबर 2018 रोजी NDTV च्या YouTube चॅनेलने अपलोड केला होता. ज्यामध्ये शिवराज सिंह चौहान यांच्यावर रॅलीत चप्पल फेकल्याचा दावा करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील सिधी येथे एका जाहीर सभेत चौहान सभेला संबोधित करणार असताना ही घटना घडली. व्हिडिओमध्ये त्याच्यावर चप्पल फेकण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे आणि स्टेजवर झालेल्या गोंधळाचेही चित्र पाहायला मिळते.
ट्विट
मध्य प्रदेश में क्या चल रहा है
शिवराज सिंह चौहान पर जूते चल रहे हैं pic.twitter.com/v3KWwUjJ6B
— Manjeet Singh Ghoshi (@ghoshi_manjeet) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)