Shocking! प्रॅक्टिकल परीक्षेच्या बहाण्याने दहावीमधील 17 मुलींचे अंमली पदार्थ देऊन लैंगिक शोषण; शाळा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल 
Women Harassment( FIle photo)

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar) एका शाळेतील शिक्षकांवर 17 विद्यार्थिनींना मादक पदार्थ खाऊ घालून त्यांचा विनयभंग (Molestation) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षकाने दहावीच्या 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलच्या बहाण्याने शाळेत थांबवून घेतले. त्यानंतर जेवणात दिल्या जाणाऱ्या खिचडीत मादक पदार्थ मिसळून त्यांचा विनयभंग करण्यात आला. या घटनेनंतर मुली पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजप आमदाराच्या हस्तक्षेपानंतर आणि तक्रारीनंतर, एसपी सिटी आणि एएसपीच्या तपासात घटनेचा खुलासा झाला.

घटनेच्या 17 दिवसांनंतर, दोन शाळा चालकांविरुद्ध विनयभंग, अंमली पदार्थ आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपींनी घटना लपवणाऱ्या आणि पीडितांच्या नातेवाइकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस स्टेशनच्या प्रभारींनाही तंबी दिली आहे. 18 नोव्हेंबर रोजी पुरकाजी येथील जीजीएस इंटरनॅशनल स्कूलमधील दोन शाळाचालकांनी भोपा येथील इयत्ता दहावीच्या 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलच्या नावाखाली रात्री शाळेत ठेऊन घेतले होते.

पालकांनीही शिक्षकांवर विश्वास ठेवून आपल्या मुलींना थांबण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर त्या सर्व 17 मुलींचा विनयभंग करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत एकही महिला शिक्षिका उपस्थित नव्हती. विद्यार्थिनींना धमकावण्यात आले की, त्यांनी याबाबत कोणाला सांगितल्यास त्यांना नापास करून त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्यात येईल. दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले. त्यानंतर 2 विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितला. (हेही वाचा: MP Rape Case: मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीचा बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल)

पोलिसांनी कारवाई न केल्याने हे प्रकरण भाजप आमदार प्रमोद उटवाल यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी एसएसपींना सांगितले. एसएसपीने रविवारी एसपी सिटी अर्पित विजयवर्गीय आणि एएसपी कृष्ण कुमार विश्नोई यांना पोलिस स्टेशन पुरकाजी येथे पाठवले आणि चौकशी केली. आरोप खरे असल्याचे लक्षात येताच एसएसपींनी स्टेशन प्रभारी विनोद कुमार सिंह यांना कारवाई करण्यास सांगितले.

भोपा येथील सूर्य देव पब्लिक स्कूलचे संचालक योगेश कुमार आणि जीजीएस इंटरनॅशनल स्कूल पुरकाजीचे संचालक अर्जुन सिंग यांच्याविरुद्ध छेडछाड, अंमली पदार्थ आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.