MP Rape Case: मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीचा बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) गांधी नगर (Gandhi Nagar) परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पोलिसांनी रविवारी सांगितली. मुलीच्या म्हणण्यानुसार, ती घरी परतत असताना एका निर्जनस्थळी एका दुचाकीस्वाराने तिला अडवले आणि चार महिन्यांपूर्वी गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देऊन त्याने तिला झुडपात ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका 16 वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, ती ऑगस्टमध्ये मामाच्या घरून घरी परतत असताना बडा बांगर्डा रोडवर एका दुचाकीस्वाराने तिला अडवले.

त्या व्यक्तीने तिचे तोंड दाबले आणि तिला झुडपात ओढून नेले जेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला धमकावले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.  घाबरलेल्या मुलीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली.  तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. हेही वाचा शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष Wasim Rizvi यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म; झाले Harbir Narayan singh Tyagi असे नामांतर

त्यानंतर मुलीने ही बाब घरच्यांना सांगितली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. गांधी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष यादव यांनी सांगितले की, तरुणीकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. आरोपींच्या ओळखीचा सुगावा शोधण्यासाठी घटनास्थळाचीही तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीएस आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.