
NTPC DGM Kumar Gaurav Shot Dead: झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातून (Hazaribagh District) मोठी बातमी समोर येत आहे. येथे एनटीपीसीच्या डीजीएमची गोळ्या घालून हत्या (NTPC DGM Murder) करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी घडली. मृताचे नाव कुमार गौरव ( Kumar Gaurav)असे आहे. कुमार गौरव यांना एनटीपीसी कोळसा प्रकल्पाच्या केरेदारी येथे डिस्पॅच विभागाचे डीजीएम म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कुमार गौरव हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला घेरले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
हजारीबाग जिल्ह्यातील कटकमदग पोलीस स्टेशन परिसरातील फताहाजवळ ही घटना घडली. डीजीएम कुमार गौरव यांना जखमी अवस्थेत आरोग्य रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एनटीपीसीच्या डीजीएमवर गोळीबार झाल्याची बातमी मिळताच स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. (हेही वाचा -Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक)
ऑफिसला जात असताना केला हल्ला -
प्राप्त माहितीनुसार, एनटीपीसीचे डीजीएम कुमार गौरव शनिवारी सकाळी त्यांच्या ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते ऑफिसच्या स्कॉर्पिओमध्ये बसले होते. त्याच वेळी, हजारीबागच्या कटकमदग पोलिस स्टेशन परिसरातील फताहाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. (वाचा -Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकीवर हल्ला करण्यापुर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात केला होता सराव)
एनटीपीसी कर्मचाऱ्यांमध्ये संताप -
सध्या कुमार गौरव यांचा मृतदेह हजारीबाग येथील आरोग्यम रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोलिस घटनेचा तपास करण्यात व्यस्त आहेत. हजारीबागचे एसपी देखील घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही एनटीपीसी अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबाराच्या अशा घटना घडल्या आहेत.