
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १२ वर्षाच्या मुलाचं गोळीबार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. घरात असलेल्या बंदूकीसोबत खेळत असताना स्वत: च्या हातातून चूकून गोळी झाडली गेली आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी घडली. (हेही वाचा- दहावीचा विद्यार्थी शाळेत पायी जात असताना अचानक खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुलगा आपल्या मामाच्या घरी आला होता. त्यावेळीस त्याच्या घरी बंदूक ठेवली होती. बंदुकी लोडेड होती. लोडेड बंदूकीसोबत खेळणं हे मुलाच्या अंगाशी बेतले आहे. अचानक बंदूकीची ट्रीगर दाबली गेली. गोळी थेट मुलाच्या पोटात लागली. गोळीचा आवाज ऐकताच घरात असल्या दोन्ही बहिणी खोळीत गेला. तेव्हा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता.
शिवा सिंग असं मृत मुलाचे नाव आहे. त्याचे मामा संजय सिंग प्रेम नगर येथील भाड्याच्या खोलीत राहतो. संजय हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. रात्रीची ड्युटी संपवून घरी आले होते. बंदूक लोडेक करून ठेवली होती. संजय लोडेड बंदूक ठेवून बाजारात भाजी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटना घडली. शेजारच्यांनी या घटनेची माहिती संजय यांना दिली. संजय यांनी शिवाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
परंतु रक्तस्त्राव जास्त झालेल्याने आणि गोळी थेट पोटात लागल्याने शिवाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस यांनी घटनास्थळी एक पथक पाठवले आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. बंदुक पोलिसांनी जप्त केली आहे.