माणुसकीला काळीमा! 13 वर्षीय मुलीवर 8 महिन्यांहून अधिक काळ 80 जणांचा बलात्कार; आरोपींना अटक
Representational Image (Photo Credits: Pixabay)

आंध्र प्रदेशमधून (Andhra Pradesh) अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची एक भयानक घटना समोर आली आहे. गुंटूरमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर 80 जणांनी बलात्कार (Rape) केला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे. अहवालानुसार, या मुलीला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील वेश्यागृहात विकण्यात आले होते. आंध्र पोलिसांनी तिथून मुलीची सुटका केली. आठ महिन्यांत 80 हून अधिक लोकांनी या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींपैकी एक बी.टेक.चा विद्यार्थीही आहे. मुलीची मानसिक आणि शारीरिक स्थिती दयनीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सवर्णा कुमारी नावाच्या महिलेने जून 2021 मध्ये कोविड-19 साथीच्या काळात गुंटूर येथील रुग्णालयात पीडितेच्या आईशी मैत्री केली होती. यानंतर पीडितेच्या आईचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. त्यानंतर ही महिला पिडीतेच्या वडिलांना न सांगता पिडीतेला आपल्यासोबत घेऊन गेली. पुढे मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. आंध्र आणि तेलंगणातील वेश्यागृहांमध्ये त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी मुख्य आरोपी सवर्णा कुमारीचा शोध घेतला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणातील पहिली अटक जानेवारी 2022 मध्ये करण्यात आली होती. 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम क्षेत्र पोलिसांनी बीटेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली आणि त्याचवेळी पीडितेची सुटकाही केली. या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आतापर्यंत 80 जणांना अटक करण्यात आली आहे. काही फरार आरोपींचा शोध सुरू आहे. उपचारानंतर मुलाला तिच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे. (हेही वाचा: पतीला Unnatural Sex चे व्यसन, विरोध करताच पत्नीला द्यायचा Electric Shock; पोलिसांत तक्रार)

आरोपींपैकी काही वेश्याव्यवसाय चालवणारे आहेत, 35 दलाल आहेत आणि बाकीचे ग्राहक म्हणून आलेले लोक आहेत. मुलीच्या वयाचा आणि परिस्थितीचा फायदा घेत अनेक ठिकाणी तिची खरेदी-विक्री झाली. या प्रकरणात, पोलिसांनी विजयवाडा, हैदराबाद, काकीनाडा आणि नेल्लोर येथून अटक केलेल्या आरोपींकडून एक कार, 53 मोबाईल, तीन ऑटो आणि काही दुचाकी जप्त केल्या आहेत.