Shocking!  पतीला Unnatural Sex चे व्यसन, विरोध करताच पत्नीला द्यायचा Electric Shock; पोलिसांत तक्रार
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पतीने पत्नीसोबत क्रूर आणि अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना समोर आली आहे. पतीने पती आपल्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेवतो. तसेच यास विरोध केला असता तो तिला बेदम मारहाण करतो, असा आरोप केला आहे. इतकेच नाही तर अनेकदा विरोध केल्यावर पतीने तिला करंट (Electric Shock) दिला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुरैना जिल्ह्यातील एका 26 वर्षीय महिलेचा विवाह ग्वाल्हेरच्या बारागाव येथील रहिवासी इक्बालसोबत 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचल्यापासून तिला पतीच्या क्रौर्याचा सामना करावा लागत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेने सांगितले की, तिचा पती तिच्यावर लग्नानंतर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. महिलेने त्याच्यासोबत अयोग्य पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला असता तिचा पती तिला जनावराप्रमाणे मारहाण करतो. गेल्या एक वर्षापासून महिला हा अत्याचार सहन करत आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Mumbai: धक्कादायक! 5 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला कपड्यांवरून हात लावायचा बाप; कोर्टाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा)

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तिने अनैसर्गिक सेक्सला विरोध केला. तेव्हा तिच्या पतीने तिच्यासोबत अतिशय वाईट वर्तन केले. एकदा महिलेने ही घटना आईला सांगितल्यावर पतीने तिच्यासोबत क्रूरतेची हद्द ओलांडली. महिलेने सांगितले की, तिच्या पतीला अनैसर्गिक सेक्स करण्याची सवय आहे आणि तेच त्याला आवडते. पीडित महिलेने पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी पतीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. सीएसपी महाराजपुरा रवी भदौरिया यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, महिलेचे पहिले लग्न 10 वर्षांपूर्वी वयाच्या 16 व्या वर्षी ग्वाल्हेरमधील एका कुटुंबात झाले होते. लग्नानंतर काही वेळातचं पतीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यावेळी महिला गरोदर होती. पतीच्या निधनानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. जी आता 9 वर्षांची आहे. त्यानंतर 2017 मध्ये राजस्थानच्या ढोलपूरमध्ये दुसरे लग्न झाले. परंतु, तिथे तिचे नवऱ्यासोबत जुळले नाही. त्यामुळे तिने घटस्फोट घेतला. आरोपीसोबत तिचा तिसरा विवाह 2021 मध्ये झाला होता.