आज नरेंद्र मोदी मंत्रीमंडळाच्या बैठकीत खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार शिवराज सिंह चौहान यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे देशाचे कृषीमंत्री अशी शिवराज सिंह चौहान यांनी नवी ओळख निर्माण झाली आहे. शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून तब्बल 8 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने त्यांचं मुख्यमंत्रिपद काढून घेत त्यांना मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. (हेही वाचा - Modi Cabinet List 2024 Ministers Portfolio: 4 मंत्र्याच्या खात्यांमध्ये कोणताही बदल नाही; नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला मिळाले कोणते मंत्रिपद; पाहा संपूर्ण यादी)
पाहा पोस्ट -
Modi cabinet portfolios: Shivraj Singh Chouhan likely to get the Ministry of Agriculture and Farmers Welfare and Ministry of Rural Development and Ministry of Panchayati Raj
(File photo) pic.twitter.com/DabQevn2lF
— ANI (@ANI) June 10, 2024
दरम्यान, शिवराज सिंह यांच्या व्यक्तीरिक्त मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना गृह विभाग, राजनाथ सिंह यांना संरक्षण, निर्मला सीतारामण यांना अर्थ, एस. जयशंकर यांना परराष्ट्र आणि नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवराज सिंह यांच्या रुपात देशाला नवे कृषीमंत्री मिळाले असून मध्य प्रदेशकडे पुन्हा एकदा कृषीमंत्री पद मिळाले आहे.
नव्या राज्यमंत्र्यांनाही खातेवाटप जाहीर केले आहे. जितिन प्रसाद यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, श्रीपाद येसो नाईक यांना ऊर्जा मंत्रालय, पंकज चौधरी यांना अर्थ मंत्रालय, कृष्ण पाल यांना सहकार मंत्रालय, रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, राम नाथ ठाकूर यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, नित्यानंद राय यांना गृह मंत्रालय, तर अनुप्रिया पटेल यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.