Modi Cabinet List 2024 Ministers Portfolio: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Cabinet) यांनी सोमवारी पहिली मंत्रिमंडळ बैठक (Modi Cabinet Meeting) घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षतेखालील आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत घरे बांधण्यासाठी 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच पीएम मोदींनी मंत्रिमंडळातील विभागांचीही विभागणी केली. राजनाथ सिंह यांना संरक्षण, निर्मला सीतारामन यांना अर्थ मंत्रालय आणि शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे.
वृत्तानुसार, नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन मंत्रालय कायम ठेवण्यात आले. अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांच्याकडे मॉस रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेचा कार्यभार आहे. निर्मला सीताराम आणि राजनाथ सिंह यांच्याकडे अनुक्रमे अर्थ आणि संरक्षण मंत्रालये कायम आहेत. मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. (हेही वाचा -(हेही वाचा - PM Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण किती शिकलेलं? काही मंत्री 12वी पास तर काहींनीचं पूर्ण केली आहे पदव्युत्तर पदवी, वाचा सविस्तर)
Portfolio for PM Modi-led Union Cabinet announced
Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, Nirmala Sitharaman, Dr S Jaishankar Piyush Goyal and Ashwini Vaishnaw retain their ministries. pic.twitter.com/LkZ0MQiTnk
— ANI (@ANI) June 10, 2024
वाटप करण्यात आलेल्या मंत्र्यांची आणि खात्यांची यादी -
- गृह मंत्रालय केंद्रीय मंत्री: अमित शहा
- अर्थमंत्रालय केंद्रीय मंत्री : निर्मला सीताराम
- संरक्षण मंत्रालय - केंद्रीय मंत्री : राजनाथ सिंह
- परराष्ट्र मंत्रालय - केंद्रीय मंत्री : एस जयशंकर
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय : नितीन गडकरी
- राज्यमंत्री: अजय टमटा, हर्ष मल्होत्रा
- पर्यटन मंत्रालय : गजेंद्र सिंह शेखावत
- कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग - शिवराज सिंह चौहान
- युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय - चिराग पासवान
- महिला आणि बाल विकास मंत्रालय - अन्नपूर्णा देवी
- नागरी विमान वाहतूक मंत्रालय - किंजरापू राममोहन नायडू
- रेल्वे मंत्रालय - अश्विनी वैष्णव
- माहिती आणि प्रसारण मंत्रालय
- आरोग्य मंत्रालय - जे पी नड्डा
- जलशक्ती मंत्रालय - सीआर पाटील
- संसदीय कामकाज मंत्रालय - किरेन रिजिजू
- भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय - भूपेंद्र यादव
- पोलाद मंत्रालय - एचडी कुमारस्वामी
- अवजड उद्योग मंत्रालय - एचडी कुमारस्वामी
- दूरसंचार मंत्रालय - ज्योतिरादित्य सिंधिया
- अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय - रवनीत सिंह बिट्टू
- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय - हरदीप सिंग पुरी
- वस्त्र मंत्रालय - गिरीराज सिंह
- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय - प्रल्हाद जोशी
स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री
- राव इंद्रजित सिंग
- जितेंद्र सिंग
- अर्जुन राम मेघवाल
- प्रतापराव जाधव
- जयंत चौधरी
राज्यमंत्री
- जितीन प्रसाद
- श्रीपाद नाईक हे ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत
- पंकज चौधरी
- कृष्ण पाल गुर्जर
- रामदास आठवले
- रामनाथ ठाकूर
- नित्यानंद राय
- अनुप्रिया पटेल
- व्ही सोमन्ना
- चंद्रशेखर पेमसानी
- एसपी सिंग बघेल
- शोभा करंदलाजे या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहेत
- कीर्तीवर्धन सिंग
- बीएल वर्मा
- शंतनू ठाकूर
- कमलेश पासवान
- बंदी संजय कुमार
- अजय टमटा हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आहेत
- डॉ एल मुरुगन
- सुरेश गोपी
- रवनीत सिंग बिट्टू हे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आहेत
- संजय सेठ
- रक्षा खडसे
- भगीरथ चौधरी
- सतीशचंद्र दुबे
- दुर्गादास उईके
- सुकांता मजुमदार
- सावित्री ठाकूर
- तोखान साहू
- राजभूषण चौधरी
- भूपती राजू श्रीनिवास वर्मा
- हर्ष मल्होत्रा हे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे राज्यमंत्री आहेत
- निमुबेन बांभणियम
- मुरलीधर मोहोळ
- जॉर्ज कुरियन
- पवित्र मार्गेरिता
2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ५४३ पैकी २९३ जागा जिंकल्यानंतर मोदींनी विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.