Worli Hit And Run Case: वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. त्यात काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी घटनेतील मृत महिला कावेरी नाखवाचे यांचे पती प्रदीप नाखवा यांची भेट घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रदीप नाखवा यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,अपघातापूर्वी आरोपी गेलेल्या बारचा बेकायदेशीर भाग बीएमसीने पाडला. काल मुंबई पोलिसांनी या बारची झडती घेतली होती. (हेही वाचा:'मम्मी माझे सर्वस्व! ती मला परत हवी' वरळी येथील BMW Hit And Run मध्ये ठार झालेल्या कावेरी नाखवा यांच्या मुलीची आर्त हाक (Watch Video) )
काल मुंबई पोलिसांनी 45 वर्षीय महिलेला कार अपघातामध्ये ठार केल्यानंतर फारार झालेला 24 वर्षीय आरोपी मिहीर शाह याला अटक केली. मुंबई पोलिसांची सहा पथकं मिहीर शाहच्या मागावर होती. दरम्यान मिहीरचा शोध घेण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
दरम्यान, याआधी शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. या घटनेनंत ठाकरे आदित्य यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतली होती. या प्रकरणास आपण कोणताही राजकीय रंग देऊ इच्छित नाही. पण, मुंबईतील गाड्या चालविण्याची पद्धत बिघडली आहे. त्यावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण आणले पाहिजे. आरोपी कोण आहे की, घटनेत कोण अडकले आहे हे पाहण्यापेक्षा दोषींवर कारवाई व्हायला हवी. तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही. त्यामुळे आपण या प्रकरणात राजकारण आणणार नाही. आमचे ते संस्कार नाहीत. फक्त या प्रकरणात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.
व्हिडीओ
#WATCH | Worli (Mumbai) hit-and-run case: Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray meets Pradeep Nakhwa, husband of the victim Kaveri Nakhwa. pic.twitter.com/oLSzOQrVkF
— ANI (@ANI) July 10, 2024
रविवारी अॅट्रिया मॉल परिसरामध्ये नाखवा दांम्पत्य बाईकवरून जात असताना पहाटे 5 च्या सुमारास मिहीर शाह याने त्याच्या BMW ने कावेरी नाखवा आणि त्याच्या पतीला चिरडले. महिला बाईक वरून पडल्यानंतर मिहिरने ब्रेक न मारता तिला फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला.