एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत गेल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) हे सातत्याने शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. या टीकेला शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा उल्लेख करत भास्कर जाधव यांनी म्हटले आहे की, 'त्यांच्यासारखा कृतघ्ना माणूस मी आयुष्यात पाहिला नाही.' शिवसेना दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत रामदास कदम यांचा उल्लेख कृतघ्न असा करतानाच म्हटले आहे की, हे तेच रामदास कदम आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते म्हणून शिवतीर्थावरुन भाषण केले आहे. तेच रामदास कदम आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेना मेळावा शिवतीर्थावर नको म्हणून प्रतिक्रिया देत आहेत. ते किती उलट्या काळजाचे आणि बेईमान आहेत हे महाराष्ट्रातील जनता पाहात आहे, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Shiv Sena: बुलढाण्यानंतर सांगली येथेही शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे टळला वाद)
रामदास कदम यांनी शिवसेना सोडल्यापासून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरु केले आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत गेली तेव्हाच बाळासाहेबांची शिवसेना संपली, अशी टीका सातत्याने रामदास कदम करत आले आहेत. त्यांच्या याच टीकेवरुन भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे.
रामदास कदम यांच्यावरील टीका कायम ठेवत भास्कर जाधव म्हणाले, कोण आहेत रामदास कदम? त्यांचा शिवसेना आणि दसरा मेळाव्याशी संबंध काय? बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेता म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरुन दसरा मेळाव्यात भाषण ठोकले. आता तेच म्हणत आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मेळावा नको. त्यांच्या ते इतके कृतघ्न असतील असे मला कधीच वाटले नव्हते, असे भास्कर जाधव म्हणाले.