Share Markets Crash: शेअर बाजाराची घसरण सुरुच, Sensex आणि निफ्टीत मोठी तूट
Stock Market (Archived images)

शेअर बाजारासाठी (Stock Markets Crash) हा आठवाड दुसऱ्यांदा निराशाजनक ठरला. आज (25 एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी शेअर (Share Markets Crash) बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) अशा दोन्ही ठिकाणी शेअर बाजार लुडकताना दिसला. आज बाजार सुरु झाला तेव्हा शेअर बाजारात BSE सेंसेक्स जवळपास 1,000 पेक्षा अधिक अंकांनी खाली आला. त्यानंतर बाजारात छोटासा वधार पाहायला मिळाला. मात्र, 9.30 ला पुन्हा सेन्सेक्स 550.01 अंकांनी म्हणजेच 0.96% घरण घेऊन 16,991.40 अंकांवर राहिला. यात 57.70 अंक म्हणजेच 0.92% घसरण पाहायला मिळाली.

सकाळी 9.16 वाजता सेन्सेक्स 808.44 अंक म्हणजेच 1.41% घसरणीसह 56,683.0 वर उघडला. तर निफ्टी 232.10 म्हणजे 1.35% घसरुन 16,917 अंकांवर सुरु झाला. सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये एशियन पेंट्स, विप्रो, डिविस लॅब आणि एचसीएल आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. तर एक्सीस बँक, भारती एअरटेल आणि पावरग्रिड यांच्यात वधार पाहायला मिळाला. (हेही वाचा, Barshi Stock Market Scam: शेअर मार्केट गुंतवणुकीतून परताव्याचे आमिष, बार्शी येथील कोट्यवधी रुपयांच्या 'फटे स्कॅम' प्रकरणी एकास अटक)

दरम्यान, गुंतवणुकदारांमध्ये फेडरल रिजर्व्ह पॉलिसी मिटींगमध्ये बेंचमारक दरांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय बाजरांमध्ये गुंतवणुकदार सातत्याने गुंतवणुक काढताना दिसत आहेत. विदेशी गुंतवणुकदार कंपन्यांनीह आपल्या शेअर्सची विक्री करताना दिसत आहेत.