देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणी बुधवारीही पहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. बाजार सुरु होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्समध्ये 550 अंकांनी घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 150 अंकांनी घसरण झाली. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे 1.8 लाख कोटींचं नुकसान झालं. लोकसभा निवडणुकांमुळे शेअर बाजारात चढ उतार नोंदवले जात आहेत. (हेही वाचा - Adani Group To Enter UPI: अदानी समूह Paytm, PhonePe आणि Google Pay शी स्पर्धा करणार; कंपनी स्वत:ची UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत)
शेअर बाजारात गुरुवारी व्यवहाराची सुरुवात पडझडीने झाली. बीएसई सेन्सेक्सने 323.98 म्हणजे 0.43 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स 74.846.47 पातळीवर सुरु झाला. काही मिनिटानंतर 74,529.56 अंकापर्यंत घसरला. त्यानंतर सकाळी 11.35 वाजता सेन्सेक्स 590.63 अंकानी घसरला. संध्याकाळी शेअर बाजार बंद झाला तेव्हा शेअर मार्केट 667.55 अंकाची घसरण होऊन 74,502.90 अंकावर व्यवहार हा करत होता.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी इंडेक्समध्येही बाजार सुरु होताच घसरण पाहायला मिळाली. बाजार सुरु झाल्यानतंर निफ्टी 109.10 अंकांनी घसरला. संध्याकाळी शेअर बाजार जेव्हा बंद झाला तेव्हा 183.45 अंकाची घसरण होऊन 22,704.70 अंकावर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात व्यवहार सुरु झाल्यानंतर 974 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर 1378 शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच 97 शेअरमध्ये कोणतेही बदल झाल्याचे दिसून आलं नाही. पीएनबी हाऊसिंगच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. Hindware, Ujjivan स्मॉल फायनान्स, आयआरसीटीसी शेअर, आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त बीपीसीएल, एम अँड एम, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी आणि Tata Consumer या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळाली.