Delhi Violence: दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणारा 'शाहरुख' याला उत्तर प्रदेशातून अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई
Delhi Police | (Photo Credits: PTI)

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendenment Act) यावरुन समर्थक आणि आंदोलक यांच्यात 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात पोलिसांवर बंदुक रोखणारा आणि गोळीबार करणारा शाहरूख (Shahrukh) याला दिल्ली पोलिस क्राईम ब्रांचने उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अटक केली आहे. या हिंसाचारात शाहरुख ने दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर बंदुक रोखत आठ राऊंड फायरिंग केले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल तो आपल्या कुटुंबासह फरार होता. मात्र आता त्याला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.

आतापर्यंत दिल्ली हिंसाचारा प्रकरणी 1300 हून अधिक जणांना अटक झाली आहे. या हिंसाचारात 45 लोकांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण असून त्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. (Delhi Violence: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, हिंसाचारादरम्यान घरे खाक झालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत)

ANI Tweet:

दिल्लीत उफाळलेल्या या हिंसाचारानंतर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तर बोर्डाच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी (2 मार्च) रोजी कडक सुरक्षेत 98% विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. सध्या दिल्लीतील वातावरण शांत असून गेल्या पाच दिवसांपासून हिंसेची कोणतीही घटना समोर आलेली नाही.