केरळ मध्ये लेखक, समाजसेवक Civic Chandran यांना जामीन देताना 'sexually provocative dresses'अर्थात सेक्सी ड्रेस घातलेल्या महिलांच्या तक्रारी या Sexual Harassment म्हणून प्रथमदर्शनी घेतल्या जाऊ शकत नाहीत. असे मत नोंदवलं आहे. Kozhikode Sessions Court कडून हे मत नोंदवण्यात आले आहे.
74 वर्षीय आरोपीने जामीनासाठी अर्ज करताना महिलेचे फोटो शेअर केले होते. त्या फोटो मध्ये महिलेने घातलेले कपडे हे 'लैंगिक उत्तेजक' असल्याचं सांगण्यात आले आहे. अशा प्रकरणामध्ये कलम 354A हे प्रथम दर्शनी लावले जाऊ शकत नाही. असे Kozhikode Sessions Court कडून सांगण्यात आले आहे.
74 वर्षीय शारिरीकदृष्ट्या अक्षम आरोपी तक्रारकर्त्याला जबरदस्तीने आपल्या मांडीवर बसवून तिचे स्तन दाबू शकतो यावरही न्यायालयाने अविश्वास व्यक्त केला.
पहा ट्वीट
Kerala | Sexual harassment will not prima facie stand when the complainant was wearing a dress that was sexually provocative - Kozhikode Sessions Court observed while granting bail to activist Civic Chandran in a sexual harassment case, on 12th August. (1/2)
— ANI (@ANI) August 17, 2022
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की कलम 354 च्या शब्दांतून हे अगदी स्पष्ट आहे की आरोपीचा एखाद्या महिलेच्या विनयभंगाचा हेतू असावा. कलम 354A लैंगिक छळ आणि त्याच्या शिक्षेशी संबंधित आहे; या कलमासाठी शारीरिक संपर्क किंवा तशा काही छळाच्या गोष्टी असणं आवश्यक आहे.
फिर्यादीने आरोप केला आहे की आरोपीने तरुण महिला लेखिका असलेल्या तक्रारदाराशी लैंगिक कृत्य केले आणि फेब्रुवारी 2020 मध्ये नंदी बीचवर आयोजित केलेल्या शिबिरात तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. कोयलंडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354A(2), 341 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.