गे सिरियल किलर (Gay Serial Killer) रामस्वरूप उर्फ सोढी (Ram Saroop Sodhi) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक गुन्ह्यांबाबत माहिती पुढे आली. यामध्ये सर्वात चर्चा आहे ती त्याच्या कबुलीजबाबाची. पंजाबमधील महामार्गांवरील पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य करणाऱ्या 33 वर्षीय तरुणाने गेल्या 18 महिन्यांत किमान 11 जणांची हत्या केल्याची कबुली (Serial Killer Confession) दिली आहे. त्याच्या या विचित्र वागण्याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती पुढे आली. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मूळ त्याच्या बालपणात असल्याचे पुढे आले. त्याने पोलिसांना सांगितले की, लहानपनी मनात निर्माण झालेल्या लैंगिक भावना, मानसिक आघात आणि अनेक कारणांमुळे झालेल्या अपमानास्पद टिप्पणी. आदींमुळे आपण गुन्हेगारी कृत्यांकडे वळल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
काय आहे प्रकरण?
सिरीयल किलर रामस्वरूप उर्फ सोढी हा समलिंगी होता. त्याला समलैंगिक (Gay) संबंध ठेवण्यास आवडत असत. त्यासाठी तो दररोज नव्या सावजाच्या शोधात होता. अशा वेळी पंजाब राज्यातील महामार्ग हे त्याच्यासाठी अत्यंत आवडते ठिकाण होते. तेथे तो अनेक अनोळखी पुरुषांना लिफ्ट मागत असे. नंतर त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असे. त्यानंतर तो सदर पुरुषांना पैसे मागत असे. पैसे मिळाले की, तो ते घेऊन फरार होत असे. मात्र, जर कोणी पैसे देण्यास नकार दिला तर मात्र तो त्यांची हत्या करत असे. वय वर्षे केवळ 33 वर्षीय असलेल्या या तरुणाने गेल्या 18 महिन्यांत किमान 11 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा तो महिलांचे कपडे वापरत असे किंवा स्रीसारखे कपडे वापरत असेही, त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. (हेही वाचा, Kenyan serial killer: प्रेमाचा भयानक अंत; सीरियल किलरकडून पत्नीसह 42 तरुणींचा कुऱ्हाडीने वार करून खून)
लैंगिकतेची खिल्ली उलवल्यान राग
आरोपी सोधी याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले की, त्याच्या भावनिक जखमा आणि मिळालेल्या नकारामुळे त्याला हिंसक सूड घेण्यास भाग पाडले. त्याच्या लैंगिकतेची खिल्ली उडवणाऱ्या किंवा लैंगिक सेवेसाठी त्याला पैसे देण्यास नकार देणाऱ्या पुरुषांकडून त्याचा अपमान किंवा विश्वासघात होण्याची पुनरावृत्ती अनेकदा घडली. त्यामुळे त्याच्या मनात सूडाची भावना अधिकच पेटली. ज्यामुळे आपण गुन्हा करण्यास प्रवृत्त झालो, त्याने म्हटले आहे.
मफलर ठरला पुरावा
आरोपी रामस्वरूप उर्फ सोढी याने केलेल्या शेवटच्या हत्येवळी मागे सोडलेला पुरावा पोलिसांना या गुन्ह्याची उकल होण्यातील मोठा दुवा ठरला. ज्यामुळे पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पोलिसांनी सांगितले की, सोधीचा शेवटचा बळी ठरलेला 37 वर्षीय मनिंदर सिंग याने त्याच्या शरीराबद्दल आणि लैंगिकतेबद्दल अपमानास्पद टिप्पण्या देऊन त्याची खिल्ली उडवली. हा अपमान सहन न झाल्याने सोधीने मनिंदरची हत्या केली, जे एका मोटारसायकलवरील नेहमीच्या लिफ्टसारखे वाटत होते. मनिंदरचा मृतदेह किरातपूर साहिबजवळ सापडला, जिथे पोलिसांना एक एक मफलर सुद्धा आढळून आला. या मफलरवरुनच पोलिसांनी शोध घेत सोढी यास अटक केली.
बालपण, स्त्रियांबद्द आकर्षण आणि मेकअप
मस्वरूप उर्फ सोढी यास बालपणापासूनच महिलांबद्दल आकर्षण होते. त्याला महिलांप्रमाणे कपडे घालावे, मेकअप करावा असे वाटत असे. त्यामुळेच तो गुपचूप मेकअप करत असे आणि महिलांचे कपडेही घालत असे. पण, त्याच्या या वागण्यास घरातून विरोध झाला. पुढे 2005 मध्ये जेव्हा तो दुबईला गेला तेव्हा त्याच्या लैंगिक ओळखीला आकार मिळाला, वयाच्या 22 व्या वर्षी त्याने त्याची समलैंगिकता पूर्णपणे स्वीकारली. दरम्यान, त्याच्या काही आप्तेष्ठांकडून त्याला मिळालेला नकार आणि अपमानास्पद वागणुकीमुळे त्याला खोल मानसिक जखमा झाल्या, ज्यामुळे तो अत्यंत हिंसाचाराच्या कृत्यांना प्रवृत्त झाला.
मस्वरूप उर्फ सोढी याने स्वत:ला बदलवून घेतल्यानंतर अनेक पुरुषांशी त्याचे लैंगिक संबंध आले. मात्र, हत्येचा सिलसिला सुरु झाला तो, लष्करातील निवृत्त सैनिक हरप्रीत सिंग यांच्या सन 2024 मध्ये झालेल्या हत्येपासून. दोघांनी लैंगिक संबंध ठेवले मात्र हरप्रीत सिंह यांनी ठरलेले पैसे देण्यास नकार दिल्याने सोढी याने त्यांची हत्या केली. तसेच, त्यांच्या पाठीवर धोकेबाज असेल लिहीले. त्यानंतर त्याने आतापर्यंत मेकॅनिक, सुरक्षा रक्षक आणि रूपनगर, होशियारपूर, फतेहगड साहिब आणि सरहिंद जिल्ह्यांमध्ये त्याचा मार्ग ओलांडणाऱ्या इतरांचा हत्येत समावेश होता. बहुतांश प्रकरणांमध्ये, त्याने पीडितांना लिफ्टची मागणी करून, संक्षिप्त लैंगिक चकमकीत गुंतवून आणि त्यांनी त्याच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यास त्यांना ठार मारले.