सुप्रीम कोर्ट कॉलेजियम (Supreme Court Collegium) कडून वरिष्ठ वकील सौरभ कृपाल (Saurabh Kripal) यांना दिल्ली हायकोर्टात न्यायाशीध करण्याची सिफारिश केली आहे. कॉलेजियमच्या या सिफारशीला मंजूरी मिळाल्यास कृपाल हे भारतातील पहिलेच समलैंगिक न्यायाधीस ठरणार आहेत. कृपाल हे सर्वसामान्यपणे स्वत:ला समलैंगिक असल्याचे सांगतात आणि त्याचसंदर्भातील मुद्द्यांवर आवाज ही उठवतात.(केंद्र सरकारकडून ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय)
या संबंधित माहिती देत सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 11 नोव्हेंबरला कॉलेजियमची बैठक पार पडली. या बैठकीत सौरभ कृपाल यांच्या नावाची सिफारीश केली गेली. या पूर्वी याच वर्षात मार्च मध्ये भारतात माजी सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांना न्यायाशीध बनवण्यासाठी विचारले होते. त्याचसोबत यावर आपले मत स्पष्ट करण्याचे केंद्राला सांगण्यात आले होते.
Tweet:
Congratulations to Saurabh Kripal who is set to become the first gay judge of a High Court in the country . Finally we are set to be an inclusive judiciary ending discrimination based on sexual orientation https://t.co/iKwCAyOMSc
— Indira Jaising (@IJaising) November 15, 2021
या आधी सुद्धा चार वेळा सौरभ कृपाल यांना न्यायाधीश करण्यासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला गेा होता. परंतु सर्वांनी आपले विविध मत मांडले होते. सौरभ कृपाल यांच्या नावाची सिफारिश सर्वात प्रथम कॉलेजियमने 2017 मध्ये दिल्ली हायकोर्टात न्यायाशीध बनण्यासाठी केली होती.(Rape Case: 'शारीरिक संबंधांसाठी पूर्वी घेतलेली संमती भविष्यातील लैंगिक संबंधासाठी लागू होत नाही'; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
सौरभकृपाल यांनी दिल्लीतील सेंट स्टीफंस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथून लॉ डिग्री घेतली. त्याचसोबत कॅब्रिंज युनिव्हर्सिटी मधूनच पोस्टग्रॅज्युएश (लॉ) केले. सौरभ कृपाल यांनी खुप काळ सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुद्धा केली आहे. त्याचसोबत युनाइटेड नेशन्ससोबत जेनेवा येथे सुद्धा काम केले आहे.