Representational Image (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी ग्राहकांना दिलासा देत एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. एसबीआयने 10 नोव्हेंबर पासून MCLR चे दर 0.05 टक्क्यांपर्यंत घटवण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही ऑटो, होम किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असल्यास तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण या बँक धारकांना घटवलेल्या दराची सुविधा मिळणार आहे.

यापूर्वी बँकेने 10 ऑक्टोबरला एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांपर्यंत घटवला होता. त्याचसोबत 4 ऑक्टोबरला आरबीआयने व्याजदर 0.25 टक्क्यांनी कपात करण्यास सांगितले होते. त्यानंतर रेपो रेट 0.25 टक्के घटवून 5.15 टक्क्यांवर आला होता. एसबीआयच्या मते बँकने सर्व कालावधीतील एमसीएलआर दरात 0.05 टक्क्यांपर्यंत घटवले आहेत. त्यामुळे एका वर्षासाठी एमसीएलआरचे नवे दर 8.05 टक्क्यांवरुन 8 टक्क्यांवर करण्यात आले आहेत. बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात सातव्या वेळेस व्याजदरात कपात केली आहे.(SBI बँक खातेधारकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत 'हा' फॉर्म न भरल्यास पैशांचे व्यवहार करणे होणार मुश्किल)

आरबीआयकडून रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर एसबीआयने एमसीएलआर आधारित लोक दर सुद्धा घटवले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक महिन्यासाठी EMI 0.05% पर्यंत स्वस्त झाला आहे. बँकेकडून एमसीएलआर दरात कपात केल्याचा परिणाम लोन घेणाऱ्या ग्राहकांसोबत ज्यांनी एप्रिल 2016 नंतर लोन घेतले आहे त्यांना सुद्धा याचा लाभ होतो.