![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/02/SBI-ATM-8-380x214.jpg)
देशामध्ये पुढील काही वर्षांत सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल करण्याच्या दृष्टीने स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लवकरच एसबीआयची डेबिट कार्ड बंद केली जाणार असल्याची माहिती एसबीआयचे संचालक रजनीश कुमार यांनी मीडियाला दिली आहे. सध्या भारतामध्ये 90 कोटी डेबिट कार्ड आणि 3 कोटी क्रेडीट कार्ड वापरली ग्राहक वापरत आहे. ही कार्ड्स कायमची बंद करून आता आर्थिक व्यवहार डिजिटल करण्याचा प्रयत्न आहे. आता डेबिट कार्डशिवाय SBI ATM कार्डमधून काढा पैसे, YONO कॅश सेवेचा अशा पद्धतीने उपयोग करा
क्युआर (QR Code)च्या माध्यमातून भविष्यात आर्थिक व्यवहार केले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. SBI च्या देशभरातील एटीएम मध्ये 'योनो' ही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे केवळ मोबाईलचा वापर करून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. सध्या देशामध्ये 68,000 एटीम मध्ये अशाप्रकारची सोय आहे. लवकरच ही संख्या वाढवून 10 लाख करण्याचा स्टेट बॅंकांचा विचार आहे. त्यामुळे आपोपच डेबिट कार्ड बंद होईल. 1 ऑगस्ट पासून SBI ची IMPS सुविधा होणार मोफत, घर-गाडी खरेदी करणे सुद्धा होणार स्वस्त
-
कशी आहे YONO सुविधा?
पैसे काढण्यासाठी युजर्सला मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून 6 डिजिट रेफरेंर्स क्रमांक ही देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला 30 मिनिटांच्या आतमध्ये पैसे काढू शकता. एटीएम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 6 डिजिट पिन आणि रेफरेंर्स क्रमांक द्यावा लागणार आहे. हे पिन क्रमांक टाकल्यावर तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत. या प्रक्रियेसाठी कमी वेळ लागणार आहे. परंतु 30 मिनिटांच्या आतमध्येच तुम्हाला पैसे काढता येणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरा पिनसुद्धा जनरेट करता येणार आहे
पुढील पाच वर्षामध्ये प्लॅस्टिक कार्ड स्वरूपात असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज मर्यादित असेल. 'व्हर्च्युअल कुपन्स' हे बॅंकिंग क्षेत्राचं भविष्य आहे.