देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (SBI) बँकेने ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. त्यामध्ये आता तुम्हाला एटीएम (ATM) मधून पैसे काढायचे झाल्यास डेबिट कार्डची गरज भासणार नाही. एसबीआयने सुरु केलेल्या या नवीन सेवेसाठी 'योनो कॅश' (YONO Cash) असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा एसबीआयच्या 1.65 लाख एटीएमवर सुरु होणार आहे. तसेच कार्डशिवाय आता योनो अॅपद्वारे पैसे काढता येणार आहे.
देशात पहिल्यांदाच एसबीआयने कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या नव्या सेवेमुळे तुमच्या कार्डसंबंधित होणाऱ्या फसवणुकीच्या गोष्टींवर आळा बसणार आहे. या योनो अॅपसाठी 6 डिजिट पिन सेट करावा लागणार आहे. तसेच पैसे काढण्यासाठी युजर्सला मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून 6 डिजिट रेफरेंर्स क्रमांक ही देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला 30 मिनिटांच्या आतमध्ये पैसे काढू शकता. एटीएम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 6 डिजिट पिन आणि रेफरेंर्स क्रमांक द्यावा लागणार आहे. हे पिन क्रमांक टाकल्यावर तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत. या प्रक्रियेसाठी कमी वेळ लागणार आहे. परंतु 30 मिनिटांच्या आतमध्येच तुम्हाला पैसे काढता येणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरा पिनसुद्धा जनरेट करता येणार आहे.(हेही वाचा-SBI WhatsApp Fraud: ग्राहकांना सावधानतेचा इशारा! व्हॉट्सअॅप मेसेजद्वारा अनेक ग्राहकांची अकाऊंट्स धोक्यात)
योनो डिजिटल बँकिंग असे प्लॅटफॉर्म आहे जे 85 ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सेवा देते. एसबीआयने ही सेवा 2017 मध्ये लॉन्च केली होती. फेब्रुवारी 2019 पर्यंत योनो अॅप आतापर्यंत 1.8 करोड लोकांनी डाऊनलोड केले असून 70 लाख एक्टिव्ह युजर्स असल्याचे सांगितले गेले आहे.