SBI (Photo Credits: Facebook)

SBI SCO Recruitment 2020: देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआय त्यांच्याकडील रिक्त पदांवर नोकर भरती करणार आहे. या संदर्भात त्यांनी एक नोटीस ही जाहीर केली असून विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर,इंजिनिअर आणि अन्य एकूण 480 पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करता येणा आहे. अर्जाची प्रक्रिया डिसेंबरच्या अखेरपासूनच सुरु झाली आहे. तर 11 जानेवारी 2021 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली गेली आहे.

SBI SEO पद 2021 च्या अंतर्गत मॅनेजर (मार्केटिंग) आणि डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) च्या एकूण 38 पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी मार्केटिंग किंवा एमबीए किंवा पीजीडीबीएम झालेले उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर येथे पहा ऑफिशल नोटिफिकेशन आणि येथे करा ऑनलाईन अर्ज.

मॅनेजर क्रेडिट प्रोसीजर्स पदाच्या 2 रिक्त जागांवर उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने एमबीए किंवा पीजीडीबीएम केलेले असावे. उमेदवारांनी ऑफिशल नोटिफिकेशन येथे पहा आणि ऑनलाईन अर्जासाठी यावर क्लिक करा.

तर असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजरसह अन्य 236 पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. परंतु उमेदवाराला ऑफिशल नोटिफिकेशन येथे पाहता येणार असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

असिस्टंट मॅनेजर (सिक्युरिटी अॅनालिस्ट) आणि डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी अॅनालिस्ट) च्या एकूण 100 पदांसाठी निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तर ऑफिशल नोटिफिकेशन येथे पहा.

तर वरील काही रिक्त पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला या नोकर भरती संदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.