SBI धारकांच्या FD वरील व्याजदरात घट, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
SBI (Photo Credits-Twitter)

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे (SBI) तुम्ही धारक असाल तर तुमच्यासाठी निराशादायक बातमी आहे. कारण एसबीआयने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदारात कपात केली आहे. त्यामुळे व्याजदर 0.15 टक्क्यांवरुन 0.75 टक्क्यांपर्यंत कपात केला आहे. म्हणजेच एफडी धारकांना आता त्यावरील व्याज पूर्वीपेक्षा कमी मिळणार आहे.

एसबीआयने 7 ते 45 दिवसांसाठीच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत 46 दिवस ते 170 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच ग्राहकांना 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीसाठी 5.80 टक्के व्याज देण्यात येणार आहे. 1 वर्षापर्यंतच्या एफडीवर बँक 6.80 टक्के व्याज देणार आहे. जर 1-2 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेल्या एफडीवर 6.25 टक्के व्याज मिळणार आहे. तर 2, 3 आणि 3 पेक्षा जास्त 5 वर्ष किंवा 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज बँकेकडून खातेधारकांना मिळणार आहे.

त्याचसोबत सिनियर सीटिझन यांच्यासुद्धा व्याजदरात सुद्धा कपात केली आहे. बँकेडून सिनियर सीटिझनच्या 7-45 दिवसापर्यंतच्या डिपॉझिटवर 5.00 टक्के व्याज देणार आहे. तर 1, 2 किंवा 3 वर्ष, 3 वर्ष ते 5 वर्ष आणि 5 ते 10 वर्षांसाठीच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज मिळणार आहे.

एसबीआयने यंदाच्या आर्थिक वर्षात 8 महिन्यात सातव्या वेळेस व्याजदर घटवले आहेत. एसबीआयच्या नव्या फिक्स डिपॉझिटवरील दर 10 नोव्हेंबर पासून लागू करण्याात येणार आहेत.

दुसऱ्या बाजूला एसबीआयने 10 नोव्हेंबर पासून MCLR चे दर 0.05 टक्क्यांपर्यंत घटवण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही ऑटो, होम किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असल्यास तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण या बँक धारकांना घटवलेल्या दराची सुविधा मिळणार आहे.