Image used for representational purpose. (Photo Credit: File)

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. कारण एसबीआयच्या खात्यात कमीतकमी रक्कम असणे यापूर्वी अनिवार्य होते. मात्र आता कमीतकमी रक्कम खात्यात असणे अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच बचत खाते धारकांना कमीत कमी रक्कम खात्यात ठेवण्यासाठी स्विकारली जाणारा चार्ज द्यावा लागणार नाही आहे. तसेच बँकेने एसएमएस चार्ज सुद्धा माफ केले आहेत. दरम्यान, गेल्या काही काळापासून स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास चार्ज करत होती. त्यामुळे नागरिकांकडून संताप सुद्धा व्यक्त करण्यात आला. मात्र बँकेच्या या निर्णयामुळे 44 कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या एसबीआयच्या विविध खात्यासाठी कमीतकमी रक्कम 1 हजार रुपये ते 3 हजार रुपयापर्यंत असणे गरजेचे होते. मेट्रो सिटीत राहणाऱ्या एसबीआय बचत खाते धारकांना कमीत कमी बॅलेन्ससाठी 3 हजार रुपये, सेमी-अर्बनसाठी 2 हजार आणि ग्रामीण भागातील बचत खाते धारकांसाठी 1 हजार रुपये खात्यात असणे अनिवार्य होते. तसेच एसबीआयच्या बचत खात्यावरील व्याजदरात सुद्धा कपात केली असून 3 टक्के केली आहे. तर सध्या बचत खात्यावर ग्राहकांना 3.25 टक्के असे व्याज 1 लाख पर्यंत आणि 3 टक्के व्याज 1 लाखापेक्षा अधिक रक्कमेवर देते.(SBI च्या ग्राहकांना झटका! FD वरील व्याजदरात कपात)

जर तुम्ही खात्यातील रक्कम संतुलित न ठेवल्यास तुमच्याकडून 5 ते 15 रुपयांचा दंड स्विकारला जातो. या दंडात टॅक्स सुद्धा ग्राह्य धरला जातो. एसबीआयचे चेअरमॅन रजनीश कुमार यांच्या मते नव्या निर्णयामुळे ग्राहकांचा विश्वास वाढणार असून मिनिमम बॅलेन्स चार्ज संपवणे हे एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बँकेने हा निर्णय ग्राहकांच्या अधिक सोईसुविधा आणि बँकेच्या अनुभवासाठी खासकरुन उचलले आहे.