प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआय (SBI) यांच्या खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. कारण सणासुदीच्या काळात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असल्यास एसबीआयची ही ऑफर नक्कीच तुमच्या कामी येणार आहे. तर एसबीआयने त्यांच्या खातेधारांना दिलेले डेबिट कार्ड हे आता EMI च्या सुविधेसह दिले जात आहेत. याचा फायदा अशा ग्राहकांना होणार आहे जे होम अप्लायंसेस किंवा ऑनलाईन शॉपिंग करु इच्छितात. ग्राहकांना आपल्या खरेदी त्वरित हफ्तांमध्ये रुपांतरित करता येऊ शकते.

स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारकांना दिले जाणारे डेबिट कार्ड मध्ये Pre-Approved ईएमआयची सुविधा दिली जाणार आहे. जर ही सुविधा मिळत नसेल तर तुम्ही या संदर्भातील माहिती तुम्हाला बँकेत जाऊन मिळू शकते. असे ही असू शकते की, काही डेबिट कार्ड्ससाठी ही सुविधा लागू करण्यात आलेली नाही.(SBI Recruitment 2020: एसबीआय मध्ये 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी पदाची भरती; 'असा' करा अर्ज)

तज्ञांच्या मते, एसबीआयने आपल्या काही निवडत ग्राहकांसाठी Pre-Approved ईएमआयची सुविधा ऑनलाईन शॉपिंगसाठी दिली आहे. ग्राहक फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या माध्यमातून याचा लाभ घेऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या संकट काळात आलेल्या सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना आनंद साजरा करता यावा यासाठी बँक ग्राहकांसाठी काही स्पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या ऑफर्सचा फायदा घेत ग्राहकांना सणांच्या दिवसात आपला आनंद द्विगुणीत करता येणार आहे. बँकेने YONO अॅपच्या माध्यमातून कार लोन, गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांच्या प्रोसेसिंग फी मध्ये 100 टक्के सूटची घोषणा केली आहे.(SBI Reduced Monthly Average Balance: खुशखबर! एसबीआय ने कमी केली मासिक सरासरी शिल्लक मर्यादा; 45 कोटी ग्राहकांना मिळणार फायदा)

एसबीआय गोल्ड लोन ग्राहकांसाठी सुद्धा स्पेशल ऑफर आणली आहे. यामध्ये 7.5 टक्के कमीतकमी व्याज दरावर 36 महिन्यांसाठी परतफेड पर्याय उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त बँक 9.6 टक्के कमी व्याजावर पर्सनल लोक सुद्धा घेऊ शकतात.