SBI Reduced Monthly Average Balance: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मेट्रो आणि ग्रामीण भागासाठी किमान शिल्लक मर्यादा (Monthly Average Balance) कमी केली आहे. आता शहरी भागासाठी मासिक सरासरी शिल्लक 3000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 1000 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, किमान शिल्लक मेंटेन न करणाऱ्या ग्राहकांना लागणारे शुल्कदेखील कमी केले आहे.
विशेष म्हणजे एसबीआयच्या या नव्या नियमाचा फायदा देशातील सुमारे 45 कोटी ग्राहकांना होणार आहे. सामान्यत: किमान शिल्लक न राखणाऱ्या ग्राहकांकडून 5-15 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाते. एसबीआयने एप्रिल 2017 मध्ये किमान सरासरी शिल्लक शुल्क लागू केले होते. (हेही वाचा - Amazon च्या वेबसाईट आणि अॅपवरही IRCTC च्या तिकीट बुकींगची सुविधा; पहा, कसे कराल ऑनलाईन तिकीट बुकींग?)
दरम्यान, मेट्रो शहरांसाठी किमान शिल्लक 50% कपात केल्यास 10 रुपये आणि जीएसटी असा दंड आकारण्यात येईल. जर त्यात 50-75 टक्क्यांनी घट केली तर शुल्क 12 रुपये आणि जीएसटीचा समावेश असेल. खातेधारकाची शिल्लक 75 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास 15 रुपये आणि जीएसटी असा दंड आकारण्यात येईल. (वाचा - Bitcoin: बिटकॉइन, प्रत्यक्षात नसलेले पण अस्तित्वात असलेले चलन, 'या' 5 देशांत Cryptocurrency आहे अधिकृत, मार्केटमध्ये होतात मोठमोठे व्यवहार, घ्या जाणून)
याव्यक्तीरिक्त एसबीआयने 1 ऑक्टोबरपासून टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स लागू करण्याचादेखील निर्णय घेतला आहे. परंतु, यात शैक्षणिक कर्जाची भरणा समाविष्ट करण्यात आलेला नाही. परदेशात प्रवास करण्याच्या उद्देशाने पाठविलेल्या पैशांवर टीसीएस आकारला जाणार आहे. ही रक्कम सात लाखांपेक्षा कमी असली तरीदेखील टीसीएस लागू होईल.