Representational Image (Photo Credits: PTI)

भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयची  (SBI) सेवा दोन दिवसांसाठी काही NRI सर्विससाठी उपलब्ध नसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबद्दल बँकेने ट्विटर वर माहिती दिली आहे. बँकेने त्यांच्या एनआरआय ग्राहकांना विनंती केली आहे की, गैरसोईबद्दल साथ द्यावी. ते एनआरआयसाठी भारतीयांसाठी आपली सेवा लवकरच सुरु करणार असल्याचे ही त्या ट्विट मध्ये म्हटले आहे.(LPG Gas Cylinder Prices: एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर)

एसबीआयने ट्विट करत असे म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की कोणत्याही अडथळ्याशिवाय सुविधा देणे आणि सुविधा उत्तम बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत. यामध्ये आमची साथ द्या. बँकने ट्विट करत म्हटले की, महत्वपूर्ण सुचना. मेंटेनेसच्या कारणास्तव, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या एनआरआय सेवा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत सुरु नसणार आहेत. आमच्या असुविधेसाठी दुख व्यक्त करतो. मात्र तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा.(Ration Card New Rules: तीन महिने अन्नधान्य रेशन दुकानावरून न घेतल्यास रेशन कार्ड रद्द होणार; रिपोर्ट्स)

 Tweet:

SBI देशातील सर्वात मोठी शासकीय क्षेत्रातील बँक असून यावर लाखो ग्राहकांचा विश्वास आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क ठेवण्यासाठी आणि बँकिंगचा लाभात मदत करण्यासाठी ट्विटरवर मेसेज आणि पोस्टच्या माध्यमातून सूचना देत असते.

एसबीआय ट्विटरवर नेहमीच सक्रिय असून आपल्या ग्राहकांना ट्विटच्या माध्यमातून सुचना देत असते. बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाईन फसणवूक आणि अन्य गोष्टीसंदर्भात ही सुचना देत असते.