SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 10-11 जुलै रोजी रात्रीच्या वेळी 'या' सुविधा राहणार बंद
SBI | (Photo Credits: PTI)

SBI Alert: जर तुम्ही देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआयचे ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण काही सुविधा 10-11 जुलै रोजी रात्रीच्या वेळी स्थगित केल्या जाणार आहे. यासंदर्भात बँकेने ट्विट करत माहिती दिली आहे. अशातच जर तुम्हाला पैशांसंदर्भातील काही महत्वाची कामे करायची असाल तर ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. एसबीआयने ट्विट करत असे म्हटले आहे की, Maintenance Activity च्या कारणास्तव 10 जुलै रात्री 10.45 मिनिटांपासून ते 11 जुलै सकाळी 12.15 वाजेपर्यंत इंटरनेट बँकिंग, योनो, युपीआय आणि योनो लाइटची सर्विस काम करणार नाही आहे.(बँकींग क्षेत्रासह दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्ये 1 जुलै पासून झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर)

एसबीआयने आखणी एका ट्विटमध्ये असे म्हटले की, ग्राहकांनी आपला पासवर्ड सातत्याने बदलत रहावा. ऑनलाईन पासवर्ड बदलणे म्हणजे कोरोना व्हायरसच्या विरोधातील लसीसारखे आहे. अशातच स्वत:ची फसवणूक होण्यापासून दूर रहा.(SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! KYC च्या नावाखाली होतेय नागरिकांची लूटमार जरा सावधच रहा)

Tweet:

दरम्यान, सायबर सुरक्षा संशोधकांनी एसबीआय ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार स्टेट बँकेवर चीनी हॅकर्सची नजर आहे. चीनी हॅकर्स आता स्टेट बँकेच्या खातेधारकांच्या अकाउंटमधून पैसे लंपास करत आहेत. चीनी मूळ रुपात हॅकर्स फिशिंग स्कॅमसह बँक युजर्सला निशाण्यावर धरत आहेत.