जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण भारतीय रेल्वे, एसएससी, भारतीय पोस्ट आणि डीडीए मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. योग्य उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच उमेदवारांची निवड ही त्यांची योग्यता, शिक्षण आणि अन्य नियमांनुसार केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.भारतीय रेल्वेत नोकरीची संधी असून तेथे 2792 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 5 एप्रिल 2020 देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही नोकर भरती 10 वी पास उमेदवारांसाठी आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणतीही लेखी परिक्षा होणार नाही आहे.
तसेच भारतीय पोस्ट ऑफिसात पश्चिम बंगाल येथे 2021 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.या नोकर भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर 10 वी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर एसएससी फेज 8 पदासाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. एसएससी फेज 8 अंतर्गत 1337 पदासांठी नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी 10 वी, 12 वी आणि पदव्युत्तर उमेदवार अर्ज करणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असणे गरजेचे आहे.(कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी Digital Payment चा वापर करण्याचे RBI चे आवाहन; NEFT, IMPS, UPI सेवा चोवीस तास सुरु)
दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच डीडीए यांनी 629 पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार 23 मार्च पर्यंत अर्ज करु शकतात. तसेच पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12 वी पास ते पदव्युत्तरसह अन्य शैक्षणिक अटी पूर्ण केलेल्या असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.