संजय राउत (Photo Credits: PTI)

तिहेरी तलाक (Triple Talaq Bill) आणि कलम 370 हटवण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे देशात समान नागरी कायदा (Uniform  Civil Code) आणण्याची सुरूवात असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेने (Shiv Sena) आता पुढील लक्ष्य पाकव्याप कश्नीरमध्ये (POK) तिरंगा फडवणं हे असल्याचं म्हटले आहे. शिवसेनेकडून मोदी सरकारच्या या दोन्ही निर्णयाचं कौतुक करण्यात आलं होतं. आता केंद्र सरकार देशात लवकरच समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्न असल्याचे संकेत दिले आहेत.

यंदाचा स्वातंत्र्यदिनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये केंद्रशासित प्रदेश झालेल्या जम्मू कश्मीर ( Jammu and Kashmir)  आणि लद्दाख (Ladakh) मधील स्वातंत्र्यदिन सोहळा वेगळा असेल, आझादी म्हणजे काय याचा अनुभव येथील नागरिक घेतील असं सांगण्यात आलं आहे. जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेने व्यक्त केला आनंद; आज देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

ANI Tweet: 

देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यावर अनेक चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. समान नागरीक कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा यूनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा रंगायला आता सुरूवात झाली आहे.

भारतात सध्या मुस्लीम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत. तर हिंदू सिव्हिल लॉअंतर्गत हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध समाजासाठी आहे. जर समान नागरी कायदा आला तर धर्माची बंधनं गळून पडणार आहेत.