Surgical Strike 2: भारतीय लष्कराने कारवाई करताच राहुल गांधी म्हणाले 'हवाई दलाच्या पायलट्सना माझा सलाम'
Rahul Gandhi on Surgical Strike2 | (Photo credit: archived, edited, representative image)

Surgical Strike 2: जम्मू-कश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक 2 (Surgical Strike2) जोरदार कारवाई केली आहे. भारती लष्कराने पाकव्याप्त काश्मीरची सीमा ओलांडून पकिस्तनातील दहशतवादी तळावर हल्ले केले. यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार स्वागत केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भारतीय हवाई दलाच्या (IAF) पायलट्सना मी सलामा करतो. ' वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी POK येथील बालाकोट आणि चकोटी येथे जोरदार बॉम्बवर्षाव केला आहे. या बॉम्बवर्षावात या ठिकाणी असलेल्या दहशवाद्यांचा खात्मा झाला. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी ठार झाले याबात अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी मारल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते अभिषेख मनू सिंघवी यांनीही ट्विट करुन भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. सिंघवी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बालाकोट एलओसीपासून बरेच दूर आहे. इथे हाफिस सईद अनेक रॅली करतो. भारतीय हवाई दलाने जर कोणतेही नुकसान न होऊ देता आपले काम फत्ते केले आहे तर, ती मोठे यश आहे. या कारवाईबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतू, पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने हालचाल सुरु आहे त्यावरुन असे दिसते की, नक्कीच काहितरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा, Surgical Strike 2: शक्ती काय असते ते पाकिस्तानला दाखवून दिले, जनतेच्या मनात होते तेच घडले: मुख्यमंत्री फडणवीस)

भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांची कंट्रोल रुम उदद्ध्वस्त केली. रात्रीच्या अंधारात पहाटे 3 वाजता ही कारवाई केली. दरम्यान, गेल्या काही तासांपासून भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) विमाने सीमारेषा (Line of Control) ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत (पाकव्याप्त काश्मीर) घुसत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे