Salman Khurshid: 'ते' स्वत: तरी या मार्गाने पक्षात या पदावर पोहोचलेत काय? काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा  ‘जी-23’ नेत्यांवर निशाणा
Salman Khurshid | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी पक्षांतर्गत सुधारणाची जोरदार मागणी करत पुन्हा एकदा ‘जी-23’ नेत्यांवर निशाणा साधला आहे. सलमान खुर्शीद यांनी ‘जी-23’ नेत्यांवर टीकासत्र सोडत रविवारी (20 जून) रोजी म्हटले की, पक्षात सुधारणा त्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन होत नाही. ज्याचा अनेक वर्षे फायदा घेतला गेला. पक्षात सुधारणा आणि विकास करायचा असेल तर त्यासाठी त्याग आवश्यक आहे. याशिवाय सलमान खुर्शीद यांनी पक्षांतर्गत निवडणुकांची मागणी करणाऱ्यांवरही टीकास्त्र सोडत म्हटले आहे की, जे आज पक्षात पक्षांतर्गत निवडणुकीची मागणी करत आहेत, ते स्वत: तरी पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचले आहेत काय?

काँग्रेस नेते विरप्पा मोईली यांनी पक्षांतर्गत निवडुकीवर भर देत पक्षाला सर्वात मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. यावर सलमान खुर्शीद यांनी प्रतिक्रिया देताना सलमान खुर्शीद यांनी म्हटले की, केवळ बोधात्मक मोठी वाक्ये बोलून पक्षाला फायदा होणार नाही. तर पाठिमागील 10 वर्षांमध्ये पक्षासमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर विचार होऊन ती संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. विरप्पा मोईली हे काँग्रेसच्या ‘जी-23’ गटाचे सदस्य आहेत. (हेही वाचा, Shiv Sena MP Sanjay Raut On Congress: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला, 'आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या')

एएनआय ट्विट

सलमान खुर्शीद यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितले की, पक्षाध्यक्ष पदाची निवडणुक लढायची किंवा नाही याचा निर्णय राहुल गांधी यांना स्वत:ला करायचा आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष असो किंवा नाही. ते आमचे नेते कायमच राहतील. कपील सिब्बल आणि विरप्पा मोईली यांनी पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. यावर सलमान खुर्शीद यांनी सांगितले की, मी पक्षांतर्गत सर्जरीसाठी तयार आहे. परंतू, आपण काय काढू इच्छिता माझे हृदय, किडणी की आणखी काही? सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, पक्षात मोठी शस्त्रक्रिया जरूर करावी परंतू त्या आधी हे निश्चित करावे की, त्याचे काय परिणाम होतील. सलमान खुर्शीद यांना गांधी कुटुंबीयांच्या अगदी जवळचे मानले जाते.