Salman Khan याच्या हत्येसाठी रेकी करणारा Sharp Shooter पोलिसांच्या ताब्यात, लॉरेन्स बिश्नोई टोळीने कट रचल्याची प्राथमिक माहिती
Salman Khan | (Photo Credits: Facebook)

डीएलएफच्या सतर्कतेमुळे अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या हत्येचा कट उथळला आहे. या प्रकरणात क्राइम ब्रान्च डीएलएफने शार्प शूटर (Sharp Shooter) राहुल (Sharp Shooter Rahul) उर्फ सांगा उर्फ बाबा यास 15 ऑगस्टला उत्तराखंडमध्ये अटक केली आहे. राहुल उर्फ सांगा उर्फ बाबा हा अत्यंत कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर या आधीही खून, मारामारी, हाप मर्डर यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे की, गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नहेरा यांच्या सांगण्यावरुन राहुल याने जानेवारी 2020 मध्ये सलमान खान याची रेकी केली होती. सलमान खान तेव्हा चित्रपट 'किक 2' आणि बिग बॉस शोच्या बातम्यांमधून चर्चेत होता.

आरोपी राहुल उर्फ सांगा उर्फ बाबा याने डिसेंबर 2019 मध्ये दिल्ली येथून गुन्हेगार नरेश शेट्टी याला पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पळवून नेले होते. पुढे त्याने नरेश सेठी, कपिल आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने संदीप जठेडी याला गुडगाव पोलिसांच्या कोठडीतून सोडवले होते. नरेश सेठी, कपील आणि त्याचे इतर सहकारी अद्यापही कारागृहात आहेत.

पोलिसांनी सांगितले की, राहुल याचा या आधीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसला आहे. त्याने ऑगस्ट 2019 मध्ये इज्जर येथे एका व्यक्तीची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई याच्या सांगण्यावरु डिसेंबर 2019 मध्ये पंजाबच्या मनोट येथेही त्याने एकाची हत्या केली. त्यानंतर त्याने 20 जून 2020 ला भिवानी येथे एकाची हत्या केली आहे. त्याने 24 जून 2020 ला फरीदाबाद येथील एसजीएम नगर येथेही एकाची हत्या केली आहे. (हेही वाचा, Bigg Boss 14 New Promo: बिग बॉस 14 च्या प्रोमो मधून सलमान खान ने 2020 मनोरंजनाचा सीन पलटण्याचा केला दावा, Watch Video)

आरोपी राहुल हा एनसीआर येथील गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी काम करतो. आताही क्राईम ब्रॉंचने त्याला उत्तराखंड येथून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने सलमानच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे म्हटले आहे.