सदानंद दाते । Twitter

महाराष्ट्र एटीएस चे प्रमुख सदानंद दाते (Sadanand Date) यांना NIA महासंचालक पदी आता नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्यामध्ये शौर्य दाखवणार्‍या सदानंद दाते यांच्या शिरपेचामध्ये अजून एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. केंद्र सरकारने त्यांच्या खांद्यावर आता थेट NIA महासंचालक पदाची जबाबदारी दिली आहे. दाते हे 1990 च्या भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. मुंबई पोलीस पोलीस दलात त्यांनी कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपद भूषवले आहे.

सदानंद दाते हे मागील 30 वर्षांपासून पोलिस सेवा दलामध्ये आहेत. त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक पोलीस सेवेतल्या अनुभवांवर लिहलं आहे. प्रतिकूल परिस्थिती वर मात करत त्यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलं. आयपीएस चा पर्याय निवडत त्यांनी पोलिस खात्यामध्ये काम करण्यास सुरूवात केली.

पहा ट्वीट

कॅबिनेटच्या अपॉईंटमेंट कमिटीने 26 मार्चच्या आदेशा मध्ये दाते यांच्या NIA महासंचालक पदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. आता त्यांच्याकडे हे पद 31 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे.