दिल्लीत Sputnik V पुढील आठवड्यापासून मिळण्याची शक्यता
Corona Vaccines | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

रशियाची कोरोनावरील लस स्पुटनिक वी (Sputnik V) आता दिल्लीकरांना पुढील आठवड्यापासून मिळण्याची शक्यता आहे. तर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालात ती उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. यासाठी आता अस्थायी रुपात 15 जून ही तारीख ठरवण्यात आली आहे. अपोलो रुग्णालय आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज द्वारे स्पुटनिक वी च्या रोलआउचा पहिला टप्पा 17 मे रोजी हैदराबाद आणि 18 मे रोजी विखापट्टणम मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु झाला होता.(धक्कादायक! Covid-19 टेस्ट करताना सरपंचांच्या नाकातच मोडली Swab Stick; घशात जाऊन अडकली, जाणून घ्या काय घडले पुढे)

अपोलो दिल्लीचे प्रवक्ते यांनी असे म्हटले की, हा कार्यक्रम 15 जून पासून सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा लसींचे डोस सोमवार पर्यंत येतील. केंद्र सरकारद्वारे खासगी रुग्णालयांना स्पुटनिक वी ची किंमत 1145 रुपये ठेवली आहे. तर भारत बायोटेकच्या लसीसाठी 1410 रुपये ठरवण्यात आली आहे. आता दिल्लीत 60,79,917 कोरोनाचे डोस दिले आहेत. यामध्ये 14,40,721 लोकांना लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे.

Tweet:

दिल्ली सरकारने आपल्या शिक्षकांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी एक लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. कोरोना व्हायरसच्या महासंकटादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून सरकारकडून या केंद्राची स्थापना केली आहे. खरंतर दहा दिवसांपूर्वी शिक्षण निर्देशालयाने म्हटले की, दिल्ली सरकार शाळेतील शिक्षकांना तत्काळ आधारावर लस द्यावी. कारण कोरोना महासंकटाच्या दरम्यान त्यांनी फ्रंट वर्कसच्या आधारावर काम केले आहे.(भारतात सुरु होणार Medical Drone Delivery; 18 जून पासून ट्रायल्सला सुरुवात)

दरम्यान, दिल्लीत उद्यापासून अनलॉक होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनलॉकिंगनुसार 14 जून पासून 50 टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. तर कोरोनाची परिस्थिती सध्या दिल्लीत नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.