व्लादिमिर पुतीन आणि नरेंद्र मोदी (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यादरम्यान व्यापार तसेच विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या या चर्चेवर संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. युक्रेन रशिया युध्दादरम्यान झालेल्या या चर्चेला विशेष आंतरराष्ट्रीय महत्व आहे. पंतप्रधान मोदींनी संभाषणादरम्यान युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित संवाद साधल्याची चर्चा आहे.

डिसेंबर 2021 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. भारत भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन द्विपक्षीय व्यापार आणि इतर विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं वृत्त ANI ने प्रकाशित केलं आहे.

डिसेंबर 2021 राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या  भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात दोन्ही देशांमधील जुने संबंध वाढवण्यासाठी पहिली '2+2' मंत्रीस्तरीय चर्चा झाली. "गेल्या काही दशकांमध्ये जगाने अनेक मूलभूत बदल पाहिले आहेत आणि विविध प्रकारची राजकीय समीकरणे उदयास आली. परंतु भारत आणि रशियामधील मैत्री स्थिर राहिली. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे आंतरराज्य मैत्रीचे एक अद्वितीय आणि विश्वासार्ह मॉडेल आहे, असे त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.