Mumbai Lucknow flight: मुंबई-लखनौ फ्लाईटमध्ये बॉम्बच्या अफवेने गोंधळ, विमान थांबवून कसून तपासणी
IndiGo | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईहून लखनौला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये (Mumbai Lucknow flight) आज बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि एकच गोंभळ उडाला. तपास यंत्रणांचेही या अफवेने गोंभळ उडाला आणि ते तपास यंत्रणा कामाला लागली. दरम्यान विमान थांबवून कसून तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी सीटखाली बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या प्रवाशाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. इंडिगो फ्लाईट (Indigo Flight) क्रमांक 6E 5264 मध्ये मुंबईहून लखनौला जात असताना एका प्रवाशाने अचानक सीटखाली बॉम्ब असल्याचे सांगितले. हे समजताच विमानात गोंधळ उडाला. (हेही वाचा - Viral Video: प्रवाशाने इंडिगोच्या पायलटच्या नाकावर मारली ठोस , नेमकं काय घडलं?)

यावेळी  तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर विमानतळ पोलिसांनी त्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 506(2) आणि 505(1)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अयुब असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच त्या विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलण्यात आली होती. यामुळे  फ्लाईटमधील लोकांना देखील मोठा मनस्ताप हा सहन करावा लागला होता.