Close
Search

RSS सरसंघचालक मोहन भागवत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी विदेशी मीडियाशी साधणार संवाद; पाकिस्तानला आमंत्रण नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे या (सप्टेंबर) महिन्याच्या सरतेशेवटी विदेशी मीडियाशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून पाकिस्तान वगळून 70 देशाच्या मीडिया कर्मचाऱ्यांना याकरिता आमंत्रण देण्यात आले आहे.

बातम्या Siddhi Shinde|

मोहन भागवत (Photo Credits: PTI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे या (सप्टेंबर) महिन्याच्या सरतेशेवटी विदेशी मीडियाशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून पाकिस्तान (Pakistan) वगळून 70 देशाच्या मीडिया कर्मचाऱ्यांना याकरिता आमंत्रण देण्यात आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार हा एक ऑफ कॅमेरा कार्यक्रम असेल म्हणजेच यामध्ये पत्रकार परिषदेच्या स्वरूपात प्रक्षेपण केले जाणार नाही. यावेळी भागवत संघाचे मूळ उद्दिष्ट, पोशाख व विचारसरणी मागील कल्पना विदेशी मीडियाला समजावून सांगतील. अशाप्रकारे पहिल्यांदाच संघाकडून विदेशी मीडियाशी संवाद साधला जाणार आहे. (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात RSS चा इतिहास)

प्राप्त माहितीनुसार,सप्टेंबरच्या शेवटच्या काही दिवसात आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये ही बैठक आयोजित करण्यात येईल. यावेळी भागवत यांच्याहस्ते बैठकीचे उद्घाटन व पुढे त्यांचे भाषण व त्याला जोडून प्रश्नउत्तर सत्र घेण्यात येईल. विविध मुद्द्यांवर संघाचा पवित्रा कसा आहे, त्यापाठीमागे काय विचारसरणी आहे हे जागतिक मीडियाला समजावणे हा यामागील मुख्य हेतू असणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून संघाबाबतचे जे गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करण्यासाठीच हा संवाद साधला जाणार असे देखील संघातर्फे सांगण्यात येत आहे.

दरम्यान कार्यक्रमाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये सुद्धा आरेसेसतर्फे मोहन भागवत यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये भारतीय माध्यमांनी हजेरी लावली होती, मात्र विदेशी मीडियाला यातून वगळण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच विदेशी माध्यमानसमोर भागवत संघाची बाजू मांडणार असल्याने साहजिकच यातून काय निष्पन्न होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change