राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात RSS चा इतिहास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव (Photo Credit: ANI)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Tukadoji Maharaj Nagpur University) अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या इतिहासाचा समावेश केल्याने आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या बीए विद्यार्थ्यांच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात आता संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. 1885 ते 1974 या कालखंडातील भारताचा इतिहास या भागामध्ये आता संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठात पहिल्यांदाच RSS चा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे.

विद्यापीठानेअभ्यासक्रमात संघाच्या स्थापनेपासून म्हणजे 1925 ते आतापर्यंतच्या घटना, घडामोडी यांचा समावेश करण्यात आला आहे. RSS भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थेट सहभागी नव्हते असा आरोप केला जातो. या आरोपांना उत्तर देण्यासाठीच अभ्यासक्रमात संघाच्या इतिहासाचा समावेश केला असल्याची चर्चा आहे अशी चर्चा रंगली आहे. RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचं Twitter वर पदार्पण; केवळ एकच अकाऊंट करतायतं फॉलो!

नागपूर विद्यापीठ अभ्यास मंडळावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित शिक्षण मंचाचा पगडा असल्याने अशाप्रकारे संघाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट केला जात आहे अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.