Job | File Photo

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट भारतीय रेल्वे (Indian Railway) मधून एक आनंदवार्ता समोर येत आहे. विशेष म्हणजे केवळ इयत्ता दहावी उत्तीर्ण (SSC Pass) असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची ही मोठी संधी असणार आहे. रेल्वे भर्ती आयोगाने (आरआरसी) 2792 ऍप्रेंटिन्स (Apprentice) जागांसाठी भरती असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून. या जागांसाठी पाच मार्चपासून या पदांसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख चार एप्रिल आहे. विशेष म्हणजे, अॅपरेंटिस पदांसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आठवी/दहावी आणि आयटीआयमध्ये आलेल्या गुणांनुसार निवड करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. 7th Pay Commission: 7 वे वेतन आयोगाअंतर्गत लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार वाढीव पगार आणि अ‍ॅरियर्स

रेल्वे मधील या पदांवरील नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काही पात्रता निकष पूर्ण करणे मात्र महत्वाचे असणार आहे. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे उमेदवाराचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले हवे. उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्ष असावं. दहावी सोबतच उमेदवाराने आयटीआयची परीक्षाही उत्तीर्ण केलेली हवी. उमेदवारानं या परीक्षा कमीत कमी 50 गुणांसह उतीर्ण केलेल्या असाव्यात. एससी,एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. जनरल आणि ओबीसी उमेदवारांना अर्जाचं शुल्क 100 रूपये असेल.

दरम्यान, केंद्र सरकारद्वारे सहा लाख 83 हजार रिक्त पदे भरण्याचा देखील विचार आहे. मंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार, लवकरच केवळ आरआरबी अंतर्गत 1, 16, 391 पदे भरली जाणार आहेत, यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी मिळणार असल्याची चिन्हे आहेत.