रेल्वेने पॅरामेडिकल पदांसाठी (Paramedical Categories) भरती प्रक्रिया सुरु केली असून आजपासून आरआरबी (RRB) तर्फे कम्प्युटरवर आधारीत लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. या भरतीसाठी पहिले पर्वाची परीक्षा 19 ते 21 जुलैपर्यंत तीन शिफ्टमध्ये होईल. पहिल्या दिवशी कानपूर, आग्रा, ग्वालिअर आणि डेहरादून मध्ये आरआरबी परीक्षा घेईल. त्यानंतर 20-21 जुलै रोजी प्रयागराज, कानपूर, आग्रा, ग्वालिअर आणि डेहारादून येथे तीन टप्प्यात भरती परीक्षा होईल.
रेल्वे स्टाफ नर्स, डायटिशियन, हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, आप्टोमेट्रीस्ट आणि रेडिओग्राफर या पदासांसाठी भरती सुरु असून यासाठी 107 शहरांमध्ये 345 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत.
Doordarshan News Tweet:
#Railways to conduct recruitment drive for paramedical categories https://t.co/QpWqI1nsEv pic.twitter.com/2xDVj0VWT3
— Doordarshan News (@DDNewsLive) July 19, 2019
4.39 लाखांहून अधिक उमेदवार ही परीक्षा देतील. यात 62% महिला उमेदवार असून त्यापैकी 50% महिलांनी स्टाफ नर्स पदासाठी फॉर्म भरला आहे. मागास वर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण लागू होणारी ही पहिली भरती असल्याचे बोलले जात आहे. एकूण पदांच्या 10% वर ईडब्लूएस आरक्षण लागू होईल. यात 4654 ईडब्लूएस उमेदवार सहभागी होतील.
ही परीक्षा ऑनलाईन असून त्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असेल. प्रश्नपत्रिका 15 भाषेत उपलब्ध असेल. सर्वाधिक 64,596 परीक्षार्थी उत्तर प्रदेशातून असतील. तर राजस्थानमधून 62,772, महाराष्ट्रातून 38,097 आणि केरळातून 35,496 परीक्षार्थी सहभागी होतील. त्याचसोबत या परीक्षेत 28 ट्रान्सजेंडर उमेदवार सहभागी होतील.