JNU Violence: रितेश देशमुख, रेणुका शहाणे या सेलिब्रिटींनी जेएनयूमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा केला निषेध; पाहा ट्विट
Riteish Deshmukh and Renuka Shahane (Photo Credits: Wikimedia Commons)

नवी दिल्लीतील जवाहरला नेहरू विद्यापीठामध्ये (JNU) झालेल्या भ्याड हल्ल्याचे संपूर्ण देशभरातून प्रतिसाद उमटत आहे. विद्यापीठाच्या आत घुसून जेएनयूचे अध्यक्ष आयशी घोष यांच्यासह येथील छात्रांना देखील बेदम मारहाण केली. सुमारे 50 लोकांचा घोळका विद्यापीठाच्या परिसरात घुसला आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घोळक्याने वसतिगृहांची तोडफोड देखील केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेने या हल्ल्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांना दोषी ठरविण्यात येत आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी केलेला हा भ्याड हल्ला असून याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींनीहा या हल्ल्याचा निषेध केली.

अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी ट्विटच्या माध्यमातून हे आपला रोष व्यक्त केला आहे.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- JNU हिंसाचाराच्या विरुद्ध मुंबई व पुणे येथे मध्यरात्री पासून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आज सुद्धा होणार निदर्शने

'आपल्याला आपला चेहरा झाकण्याची गरज का आहे? कारण आपल्याला माहीत आहे की आपण काहीतरी चुकीचे, बेकायदेशीर करत आहोत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यी आणि शिक्षकांवर मुखवटा घातलेल्या गुंडांनी क्रूरपणे हल्ला केल्याची दृश्य भयंकर आहेत. अशा प्रकारची हिंसाचार सहन केली जाऊ शकत नाही,' असं म्हणत रितेश देशमुख याने आपला संताप व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे रेणुका शहाणे यांनी ही पुर्णपणे कायद्याचे उल्लंघन करणारी घटना आहे. तोंड लपवून कुणी विद्यापीठाच्या आवारात शिरून विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मारहाण कसे काय करु शकतं बरे. दिल्ली पोलीस काय करत आहे. असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, वसतिगृह शुल्काच्या शुल्कवाढीमुळे आणि येत्या सेमिस्टर परीक्षेसाठी नोंदणीवर बहिष्कार टाकल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचेही वृत्त समोर आले आहे. हा हल्ला शुल्कवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी सर्व्हर रूमची तोडफोड केल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केल्याच्या एका दिवसानंतर झाला आहे. वसतिगृहाच्या शुल्कवाढीबाबत 70 दिवसांपासून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा निषेध होत आहे.