मुकेश अंबानी आता खेळणी विकणार, कोट्यवधी रुपयात केला 'हॅमलेज' या ब्रिटिश कंपनीशी करार
Mukesh Ambani (Photo Credit: File Photo)

भारतातील आघाडीचे उद्योगपती (Indian Buisnessman) मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांनी ब्रिटिश (British Company) कालीन जुनी कंपनी हॅमलेजच्या (Hamleys)  खरेदीचा करार पूर्ण केला आहे. 259 वर्ष जुनी हॅमलेज कंपनी अंबानींनी 67.96 मिलियन पौंड म्हणजे तब्बल 620  कोटी रुपये खर्च करून विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही काळात या प्रसिद्ध कंपनीच्या व्यापारात झालेली घट पाहता नफा मिळवण्यात अपयश येत असल्यामुळे हॅमलेज कंपनीने आपली मालकी विकायचा निर्णय घेतला आह.

हॅमलेजचा मालकी हक्क सध्या हॉंगकॉंगच्या सी बॅनर इंटरनॅशनल कंपनीकडे आहे, 2015 मध्ये या कंपनीने हॅमलेज कंपनी तब्बल 100 मिलियन पौंड म्हणजेच 909 कोटींना विकत घेतली होती. यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीच्या, रिलायन्स ब्रँड लिमिटेड व सी बॅनर इंटरनॅशनल अंतर्गत झालेल्या करारानुसार गुरुवारी, 9 मे ला या हॉंगकॉंग च्या कंपनीकडून हॅमलेजची 100 टक्के मालकी अंबानींनी प्राप्त केली आहे. हॅमलेज या कंपनीची स्थापना लंडनमध्ये 1760 मध्ये झाली.

हॅमलेज हा लहान मुलांच्या खेळण्यांचा प्रसिद्ध ब्रँड असून याचे 18  देशातील 167 दुकानांमध्ये यांची उत्पादने विकली जातात. त्यात चीन, जर्मनी, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व या देशांचा समावेश आहे. यापूर्वी हॅमलेजचा भारतामध्ये विक्रीसाठी रिलायन्ससोबत करार होता. या अंतर्गत भारतातील 29 शहरांमध्ये हेमलेजची 88 दुकानं आहेत. Reliance Jio युजर्ससाठी खुशखबर! एक वेळ रिचार्ज करा, 3 मिहिने डेटा, कॉलींगसह इतर सेवा मोफत मिळवा

यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीच्या परदेशातील मालकीची ही पहिली कंपनी ठरली आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने 'जग्वार', 'लँड रोव्हर' या कंपन्यांचे मालकी हक्क 230 कोटी खर्च करून विकत घेतले होते.याबाबत माहिती देताना रिलायन्स ब्रँडचे अध्यक्ष आणि सीईओ दर्शन मेहता सांगतात की, या करारामुळे रिलायन्स या भारतीय कंपनीचे नाव जगभरातील व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध होणार आहे, हॅमलेज कंपनीचा इतिहास पाहता या ब्रिटिशकालीन कंपनीने प्रयोगात्मक विक्रीचा पाया रचून व्यापारात अनेक बदल घडवून आणले होते त्यामुळे आज या कंपनीचे मालकी हक्क मिळवणे ही स्वप्नपूर्ती म्हणता येईल".