Madhya Pradesh Crime: रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केली मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील पाटणा येथील IGIMS रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी ड्युडीवर असलेल्या डॉक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी सांयकाळी सहाच्या सुमारास वाद झाला होता. डॉक्टरासहित वॉर्ड बॉयला मारहाण केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नातेवाईकांनी डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना बंदुक दाखवली. ( हेही वाचा- बिहारमध्ये भररस्त्यात दोन पोलिसांची मारामारी)

मिळालेल्या माहितीनुसार, आराह येथील रहिवासी कुसुम देवी २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना रुग्णालयात उपचार देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. उपचारा दरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये बाचावाची झाली. एकाने डॉक्टरावर बंदूक दाखवली, यानंतर वातावरण आणखी चिघळले. रुग्णालयात वैद्यकिय व्यवस्था दिल्या नाही त्यामुळे नातेवाईक चिडले आणि डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला. नातेवाईकांनी रुग्णालयात बराच वेळ गोंधळ निर्माण केला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

रुग्णाच्या नातेवाईकांनी धारदार वस्तू घेऊन डॉक्टरांवर हल्ला केला. डॉक्टरांना हाताला, मानेला आणि डोक्याला जखमा झाल्या. परिस्थिती नियत्रंण आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरोध्दात तक्रार दाखल करण्यात आले. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या संदर्भात पुढील तपास करत आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.