RBI | (File Image)

RBI Takes Action Against 5 Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी अनेक मोठ्या बँकांवर दंड ठोठावला. या यादीत आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि अ‍ॅक्सिस बँकेसह (Axis Bank) पाच बँकांची नावे आहेत. या बँकांवर नियमांचे योग्य पालन न केल्याचा आरोप आहे. आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला 97.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

'या' नियमांचे पालन न केल्याने ठोठावण्यात आला दंड -

आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या बँका सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील काही सूचनांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे आरबीआयने बँकांवर दंड ठोठावला आहे. (हेही वाचा - RBI to Issue Fresh Notes: आरबीआय लवकरच जारी करणार 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा)

बँक ऑफ बडोदाला 61.40 लाखांचा दंड -

बँक ऑफ बडोदावर बँकेत असलेल्या वित्तीय सेवा आणि ग्राहक सेवा काउंटरबाबत जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, आरबीआयने बँक ऑफ बडोदाला 61.40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (वाचा - RBI Policy April 2025: जागतिक व्यापार तणाव, भारतीय शेअर बाजार आणि महागाईचे काय? आरबीआय धोरणाकडे देशाचे लक्ष)

आयडीबीआय बँकेला 31.8 लाख रुपयांचा दंड -

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती आणि संबंधित कामांसाठी दिलेल्या अल्पकालीन कर्जांवरील व्याज अनुदानाबाबतच्या निर्देशांचे आयडीबीआय बँकेने पालन केलेले नाही. अशा परिस्थितीत, आरबीआयने आयडीबीआयला 31.8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रला 31.80 लाखांचा दंड -

याशिवाय, बँक ऑफ महाराष्ट्रने केवायसीशी संबंधित सूचनांचे पालन केले नाही. ज्यामुळे बँकेला 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अ‍ॅक्सिस बँकेला 29.60 लाख रुपयांचा दंड -

अंतर्गत/कार्यालयीन खात्यांच्या अनधिकृत कामकाजाबाबत आरबीआयच्या निर्देशांचे अ‍ॅक्सिस बँकेनेही पालन केले नाही, त्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेवर 29.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने बँकांनी नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे ही कारवाई केली आहे.