RBI Grade B Notification 2021: ग्रेड बी ऑफिसरच्या भरतीसाठी 'या' दिवशी जाहीर केले जाणार नोटिफिकेशन, rbi.org.in वर करता येणार अर्ज
File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

RBI Grade B Notification 2021: बँक मधील नोकरीच्या शोधात असाल तर अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने एका वृत्तपत्रात ऑफिसर्स ग्रेड बी च्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार, आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अधिकृत वेबसाइट, rbi.org.in वर 28 जानेवारीला सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 28 तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

या नोकर भरतीनुसार, एकूण 322 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जाहीर केल्यानंतर उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय, निवड प्रक्रियेसह अन्य काही गोष्टींबद्दल अधिक कळू शकणार आहे. तर येथे जाणून घ्या महत्वांच्या तारखा.(RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Security Guard च्या 241 पदाची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया)

-फेज 1 च्या पेपर 1 ची परीक्षा 6 मार्च 2021 रोजी होणार आहे.

- फेज 2 आणि पेपर 3 परीक्षा 31 मार्च 2021 ला आयोजित केली गेली आहे.

- फेज 2 ची परीक्षा 1 एप्रिल 2021 ला पार पडणार आहे.

आरबीआय ग्रेड बी अॅडमिट कार्ड 2021 फेज 1 आणि फेज 2 ची परीक्षेसाठी वेगवेगळे जाहीर केले जाणार आहे. फेज 1 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फेज 2 च्या परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. परीक्षेचे गुण प्रत्येक परीक्षेनंतर जाहीर केले जाणार आहेत. तर उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.